बार असोसिएशन निवडणूक; काही उमेदवारांचे अर्ज अवैध

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या (Nashik District Bar Association) निवडणुुकीसाठी (election) 53 उमेदवार रिंगणात उतरले असून आज छाननीत दोघा उमेदवारांचे अर्ज अपात्र (Candidates’ applications are ineligible) ठरविण्यात आले. त्यात अजिंक्य गिते व पुनम शिनकर यांचा समावेश आहे.दरम्यान, या निवडणुकीला अ‍ॅड.वंदना पाटील यांनी आव्हान दिले असून

त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या दोन दिवसापासून छाननी सुरु होती.यात गिते यांच्या वकीलीला सात वर्ष पूर्ण झाले नाही म्हणून व शिनकर यांची सही नसल्याने अर्ज बाद झाला. आता अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्यासह महेश आहेर, दिलीप वनारसे, अलका शेळके रिंगणात आहे. उपाध्यक्षासाठी प्रकाश अहुजा, वैभव शेटे, सुरेश निफाडे, शरद गायधनी, बाळासाहेब आडके, सचिवपदासाठी हेमंत गायकवाड, सुरेश निफाडे, शरद गायधनी, सईद सय्यद, सहसचिवपदासठी प्रवीण साळवे, राहुल जगताप,

संजय गिते, शरद मोगल, चंद्रशेखर शिंदे, गोरक्ष मटाले, भगवान भडांंगे, सचिन धारराव, सहसचिव महिलासाठी श्यामला दीक्षित, सोनल कदम, स्वप्ना राऊत, सोनल गायकर, खजिनदार पदासाठी राहुल जगताप, रविंद्र चंद्रमोरे, कमलेश पाळेकर, हर्शल केंंगे, सदस्याच्या तीन जागासाठी संतोष जेथे, अनिल गायकवाड, महेश यादव, किरण बोंबलें, अनील शर्मा, किशोर सांळवे, प्रतीक शिंदे, शिवाजी रोनक, अरुण दोंदे, दत्तात्रय चकोर, मिलींंद कुरकुटे, आनंद पिपाडा, अरुण खांडबहाले, वसीम सैय्यद, धनंजय भोर, दिलीप पिंगळे, गोरख मटाले, सोमनाथ उगलमुगलेे, कोमल गुप्ता, सुजाता थेटे, अश्विनी गवते, मयुरी सोनवणे, सोनल गायकर, स्वप्ना राऊत, अविनाश गांगुर्डेे, मोहन पिंगळे, विशाल मटाले, इशा शर्मा, वैभव घुमरे,युुवराज देवरे, सुधाकर जाधव रिंगणात आहेते.

निवडणूक अधिकारी (Election Officer) म्हणून भगंवंतराव पाटोळे, अतुल गर्गेे, मनीष बस्ते, कविता शर्मा, दतात्रेय भोसले, अर्चना शिंदे, तेजस्वीनी शिंदे, उत्तम काकड काम पाहत आहे. 24 एप्रिलला अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. 3464 वकीलांच्या हातात उमेदवारांंचे भवितव्य आहे. या निवडणुकीला वंंदना पाटील यांंनी आव्हान दिले आहे. त्यावर न्यायाधीश जे.पी.पांडे यांच्या समोर सुनावणी सुरु आहे.मंगळवारी त्यावर निकाल दिला जाणार आहे.पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. अशोक आव्हाड, आय.वाय.पटेल, झुंजार आव्हाड काम पाहत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *