सलग चार दिवस बँका राहणार बंद; 'हे' आहे कारण
मुंबई | Mumbai
आजपासून बँका सलग चार दिवस बंद (Banks closed) असल्याने नागरिकांची (citizens) गैरसोय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या काळात इंटरनेट बँकिंगची (internet banking) सुविधा सुरू राहणार असल्यामुळे पैशांचे व्यवहार करता येणार आहेत...
याबाबत अधिक माहिती अशी की, २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत बँका बंद राहणार असून आज महिन्याचा चौथा शनिवार व उद्या (दि.२९) रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. तर ३० आणि ३१ जानेवारीला बँक कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत.
तसेच बँकांच्या दोन दिवसांच्या संपाविषयी ( Strike) माहिती देतांना स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) म्हटले आहे की, युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने ३०-३१ जानेवारी रोजी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाचा परिणाम त्यांच्या शाखांमधील कामगारांवर होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपात देशभरातील बँक शाखा कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या केल्या असून त्यात प्रमुख्याने बँकिंग वर्किंग कल्चरमध्ये सुधारणा करावी, बँकिंग पेन्शन अपडेट करावे, नॅशनल पेंशन सिस्टम (NPS) रद्द करावा, पगारात सुधारणा करून सर्व कॅडरमध्ये भरती करावी या मागण्यांचा समावेश आहे.