Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशAugust 2023 Bank Holidays : बँकांशी संबंधित कामे करून घ्या; ऑगस्टमध्ये १४...

August 2023 Bank Holidays : बँकांशी संबंधित कामे करून घ्या; ऑगस्टमध्ये १४ दिवस बँका बंद, पाहा संपूर्ण यादी

दिल्ली । Delhi

ऑगस्ट महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुढचा महिना बँकांच्या सुट्ट्यांचा आहे. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास ते त्वरित निकाली काढा. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑगस्ट महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

- Advertisement -

पारंपारिक साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त रक्षाबंधन, स्वतंत्रता दिवस, तेंडोंग लो रम फात, पारसी नवीन वर्श, श्रीमंत शंकरदेव तिथी, पहला ओएम, थिरुवोनम यांसारखे सरण आणि विशेष दिवसांमुळे ऑगस्ट महिन्यात बँका बंद राहतील. आरबीआयने जारी केलेल्या यादीनुसार ऑगस्ट महिन्यात बँकांना १४ दिवस सुट्टी असेल. मात्र संपूर्ण देशात इंटरनेट बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार करता येतील.

सुट्ट्यांची यादी

  • ६ ऑगस्ट २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • ८ ऑगस्ट २०२३ : गंगटोकमधील तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे बॅंक बंद असेल.

  • १२ ऑगस्ट २०२३ : महिन्याचा दुसरा शनिवार

  • १३ ऑगस्ट २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • १५ ऑगस्ट २०२३ : स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील

  • १६ ऑगस्ट २०२३ : पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.

  • १८ ऑगस्ट २०२३ : गुवाहाटीमध्ये श्रीमंत शंकरदेव तिथीमुळे बँका बंद राहतील.

  • २० ऑगस्ट २०२३ : रविवारी (साप्ताहिक सुट्टी)

  • २६ ऑगस्ट २०२३ : महिन्याचा चौथा शनिवार

  • २७ ऑगस्ट २०२३ : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

  • २८ ऑगस्ट २०२३ : पहिल्या ओणममुळे कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील

  • २९ ऑगस्ट २०२३ : तिरुओनममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी

  • ३० ऑगस्ट २०२३ : रक्षाबंधन

  • ३१ ऑगस्ट २०२३ : डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरम येथे रक्षाबंधन / श्री नारायण गुरु जयंती / पंग-लबसोल मुळे बँकांना सुट्टी असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या