बंगळुरूचा दणदणीत विजय

IPL
IPL

दुबई । वृत्तसंस्था

चेन्नई विरूद्ध बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूचा दणदणीत विजय झाला.

चेन्नई सुपर किंग्ज संघाची पुन्हा एकदा दयनीय अवस्था पाहायला मिळाली. बंगळुरूने १६९ धावांपर्यंत मजल मारली .

या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकांत चेन्नईचा संघ ८ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १३२ धावाच करू शकला. ख्रिस मॉरिसच्या माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज निष्प्रभ ठरले. मॉरिसने १९ धावांत ३ बळी टिपत दमदार पुनरागमन केले.

फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर आरोन फिंच २ धावांवर बाद झाला. देवदत्त पडीकल आणि विराटने डाव सावरला. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. पडीकल ३३ धावांवर माघारी गेल्यावर पाठोपाठ एबी डीव्हिलियर्सही शून्यावर बाद झाला.

फलंदाजीत बढती मिळालेला वॉशिंग्टन सुंदर केवळ १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शिवम दुबे या जोडी डाव संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला शिवम दुबेनेही त्याला साथ देत १४ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या.

त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला. या दोघांच्या नाबाद ७६ धावांच्या भागीदारीच्या बळावरच बंगळुरूने ४ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून शार्दूल ठाकूरने २, सॅम करनने १ आणि दीपक चहरने १ बळी टिपला.

१७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली केदारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जगदीशनने अंबाती रायडूसोबत ६४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर चेन्नईच्या डावाला गळती लागली. . बंगळुरूकडून दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या ख्रिस मॉरिसने १९ धावांत सर्वाधिक ३ बळी टिपले.

बंगळुरूच्या संघाने ६ पैकी ४ सामने जिंकले आहे तर चेन्नईचा हा ७ सामन्यांत पाचवा पराजय ठरला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com