मुसळधार पावसामुळे बंधारा फुटला; शेतीचे नुकसान

मुसळधार पावसामुळे बंधारा फुटला; शेतीचे नुकसान

घोटी । जाकीर शेख Ghoti

घोटी ( Ghoti )परिसरात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस ( Heavy Rain)पडला आहे. चार तासात जवळपास १७० मिमी इतका जोरदार पाऊस पडल्याने फळविहीरवाडी येथील बंधारा फुटला आहे. या पाण्यामुळे बंधारा परिसरातील भात शेती व बागायती शेतीचे नुकसान झाले असुन या ठिकाणी कृषी अधिकारी व मंडल अधिकारी यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार अशी माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी या ठिकाणी भेट दिली असता दिली. इगतपुरी तालुक्यातील अडसरे बु. येथील फळविहीरवाडी येथे ढगफुटी होऊन जवळपास १७० मिमी पाऊस केवळ चार ते पाच तासांत झाल्याने येथील ४४ वर्षाचा जुना पाझर तलाव फुटुन अनेक शेतकऱ्यांचे भातशेती व बागायती शेतीचे नुकसान झाले आहे.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. यामुळे फळविहीरवाडी येथील बंधारा फुटला असून किमान १०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. भात शेती आणि काही घरांना बंधाऱ्याच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. फळविहीर गावाला जाणारा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेला आहे.

ह्या गावासह परिसरातील गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून शेतीचे खूपच नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने ह्या भागातील शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात आज तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तव,ग्रामसेविका एन. एस. घुले यांनी थेट पाहणी करून पंचनामे केले आहे.

यावेळी अडसरेचे सरपंच संतू साबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम कातोरे, रतन बांबळे, हौशीराम कातोरे, सागर साबळे आदींनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला. तसेच सन. १९७८ मध्ये बांधण्यात आलेला हा पाझरतलाव अचानक झालेल्या धगफुटीने सांडव्यासह वरून पाणी उलटले होते. त्यामुळे अति खोलगट जागेवरील बांधावर पाण्याचा जोर वाढल्यामुळे जवळपास वीस फूट बांध वाहून गेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले आहे.

अडसरे बु येथील फळविहिरवाडी येथे १९७८ साली हा पाझरतलाव बांधण्यात आला होता.

पाझर तलावाच्या खालीच आमची भात शेती असुन यामुळे भात शेतीत पूर्ण पाण्याखाली गेली व शेतात माती वाळू झाल्याने पीक उद्धवस्त झाले आहे त्यामुळे शासनाने लगेच भरपाई करावी

कुंडलिक साबळे, फळविहिर वाडी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com