प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती निर्मितीवर बंदी

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती निर्मितीवर बंदी
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्मिती (Plaster of Paris idols), आयात, साठा बंदीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar) यांनी दिले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (Central Pollution Control Board)12 मे 2020 च्या सुधारीत नव्या मार्गदर्शक तत्वानुसार नदीचे प्रदूषण व नुकसान टाळण्याकरीता केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी (Ban on making of plaster of Paris idols) घातली आहे. उच्च न्यायालयाने देखील ही बंदी कायम केली आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरीसपासून मूर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सुधारीत मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र दिले आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती निर्मिती, आयात, साठा करणारे व्यापारी तसेच अधिकार्‍यांत जागरुकतेसाठी मार्गदर्शक तत्वांची 1 जानेवारी 2021 पर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुदतवाढ दिली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 1 जानेवारी 2021 पासून बंधनकारक केली असल्याने नवीन मार्गदर्शक सूचनानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मूर्ती विक्रेते, कारखाने, कारागीर साठवणुक करणारे व्यापारी, दुकानदार, गाळेधारकांना प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती निर्मिती, आयात, साठा बंदी घातली आहे.

नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीं नदीपात्रात वा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतात विसर्जित करू नये. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरूध्द नियमानुसार कारवाई करणेत येईल. -रमेश पवार, प्रशासक तथा आयुक्त

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com