Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात शिक्षकांच्या ३० हजार जागा भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे घोरणबंद केले आहे. त्यानुसार यापुढे शिक्षकांना आंतरजिल्हा बंदी घेता येणार नाही. नवीन भरतीतील शिक्षकांसाठी आंतरजिल्हाबंदी लागू करताना जुन्या शिक्षकांनाही जिल्हा निवडण्याची एकमेव संधी देण्यात आली आहे. शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवीच असल्यास त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार असून भरती निघणाऱ्या जिल्ह्यात नोकरीसाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे.

- Advertisement -

खात्यात पैसे नसले तरी 10,000 रुपये काढा

शिक्षक भरती ज्या जिल्ह्यात निघेल त्या जिल्ह्यात अर्ज करून शिक्षक नोकरी मिळवतात. मात्र एकदा नोकरी मिळाली की आपल्याला हव्या त्या जिल्ह्यात बदली करून घेतली जाते. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांत मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त राहतात. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आंतरजिल्हा बदली बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला असून याविषयीचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. ग्रामविकास विभागालाही याविषयीचे निर्देश देण्यात आले आहेत.

या शासन निर्णयानुसार ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे मात्र विनंती बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची प्रतीक्षायादी तयार करून पदे रिक्त होतील त्याप्रमाणे नियुक्ती दिली जाणार आहे.

सटाणा, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती

जुन्या शिक्षकांसाठी बदली इच्छुक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एक संधी दिली जाईल. जिल्हांतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अपवादात्मक प्रकरणांतील बदलीबाबत ग्रामविकास विभागाने धोरण ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शाळेत आणि शाळेच्या आवारात मद्य तसेच तंबाखू जन्य पदार्थ बाळगल्यास किंवा सेवन केल्यास शिक्षकांवर कठोर कारवाई होणार आहे. शिक्षण सेवकांचे मूल्यमापन होणार असून त्यांचा शिक्षण सेवक पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या शिक्षकाच्या सेवेचे मूल्यमापन करण्या येणार आहे. त्याची मुल्यमापन चाचणी घेण्यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा पिरषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठीत करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शिक्षकांनी आचाारसंहितेचा भंग केल्यास त्याला वर्तणुकीत सुधारणा करण्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास ६ महिन्यांसाठी जिल्हा प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरही न झाल्यास ६ महिन्यांसाठी ५० टक्के वेतनकपात करून पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. त्यानंतरही न झाल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

‘सी-40’ उपक्रम : पर्यावरण संवर्धनासाठी नाशिकची निवड; कार्बनचे उत्सर्जन घटणार

- Advertisment -

ताज्या बातम्या