Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याउत्तर महाराष्ट्रात यंदा फटक्यांना बंदी, जाणून घ्या काय आहे कारण?

उत्तर महाराष्ट्रात यंदा फटक्यांना बंदी, जाणून घ्या काय आहे कारण?

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वसामान्यांसह दुकानदारही दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह (nashik)उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर (firecrackers)बंदी आणली आहे.

सानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार, कारण…

- Advertisement -

विशेष म्हणजे नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगरमधील महापालिका, नगरपालिकांसाठीदेखील ठराव मंजुरीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

का केली फटाक्यांना बंदी

विभागीय आयुक्तांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदर्भ देत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रारूप टूलकीटनुसार फटाके बंदीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शंभर गुण देण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात शहरी भागात अधिक प्रमाण असल्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीने ठराव करणे आवश्यक आहे.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

काय आहे आयुक्तांचे पत्र

उत्तर महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांनी 15ऑक्टोबरच्या आधी फटके बंदीचा ठराव मंजूर करावा. २२ ऑक्टोबर पर्यंत त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याचं आयुक्तांनी आपल्या पत्रात दिल्या आहेत.

राजेश टोपेंनी केले होत आवाहन

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. डेथ ऑडिट कमिटी आणि टास्क फोर्सशी बोलणं झालं. त्यांनीही थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास मज्जाव करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा विषय चर्चेसाठी आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या