Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याग्रीन झोनमध्ये गौण खनिज उत्खननावर बंदी

ग्रीन झोनमध्ये गौण खनिज उत्खननावर बंदी

नाशिक । प्रतिनिधी

गोदेचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वत उत्खनन प्रकरणानंतर गठित करण्यात आलेल्या बैठकीत यापुढे पर्यावरण ऱ्हास होणार नाही यावर भर देण्यात आला असून तीन झोन करण्यात आले असून ग्रीन झोनमध्ये उत्खननावर बंदी घालण्यात आली आहे.मॉडरेट झोनमध्ये अटीशर्तीवर परवानगी असेल. तर ओपन झोन येथे परवानगी घेऊन उत्खनन करता येईल.

- Advertisement -

पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यात स्वतंत्र टास्कफोर्सची स्थापणा झाली आहे. पहिल्या सभेतच उत्खनन करण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. टास्कफोर्सने निश्चिती केलेल्या नियमांनुसार, परवानगी असलेल्या ठिकाणीच आता उत्खनन करता येणार आहे.

स्थापित करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकाऱी आहेत. त्यात पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, जीएसडीए, पुरात्व, वन विभाग, जलसंपदा यासह विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी घेण्यात आले आहे. शिवाय या क्षेत्रात अनुभवी, तज्ञ आणि प्रत्यक्ष काम केलेल्या अशासकीय सदस्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्याच सभेत मोठी झुंबड उडाली.

प्रत्येकाने लॉबींग करण्यासाठीही प्रयत्न सुरु केले. परंतू जिल्हाधिकार्‍यांनी मात्र त्यासाठी स्पष्टपणे अटीशर्ती घालून अगदी लायक व्यक्तीचीच नियुक्ती करण्याबाबत सांगितले. त्यामुळे ही टास्कफोर्स ठरलेल्या नियमांनुसारच संपूर्ण जिल्ह्यात काम करत पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करेल. खाण माफियांकडून अवैध उत्खनाला पुर्णपणे आळा बसावा यासाठीच ही समिती आता काम करणार आहे.

परंतू अशासकीय सदस्यांची अद्याप नियुक्ती झाली नाही. त्यात नरेडको, क्रेडाई, इतर तांत्रिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, काही खडी क्रशर व्यावसायिकांसह प्रशासनाच्या वतीने सर्वांना खुले आवाहन करण्यात आले आहे. आपल्या कामाच्या अनुभवाची पुरावे, सादर केल्यास लागलीच अशा व्यक्तींची समितीवर नियुक्ती केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट सांगितल्याचे जिल्हा खणिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.

वन विभागाकडून, पुरातत्व विभाग, प्रदूषण महामंडळ या विभागांकडून आता संरक्षित झोन, ऐतिहासिक परिसर, धार्मिक परिसर, पर्यटनीय परिसर याची माहीती मागविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या