Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासिन्नर तहसीलदारांच्या खुर्चीत बाळूमामा विराजमान होतात तेव्हा...

सिन्नर तहसीलदारांच्या खुर्चीत बाळूमामा विराजमान होतात तेव्हा…

डुबेरे | Dubere

तहसीलदारांच्या खुर्चीवर बसण्यासाठी अनेकांना अनेक दिव्यातून जावे लागते, कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मात्र सिन्नर येथील तहसील कार्यालयातील शिपाई बाळूमामा यांना आज (दि.31) सेवापूर्तीच्या निमित्ताने तहसीलदारांच्या खुर्चीत बसण्याचा मान तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी दिला. तहसीलदारांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे…

- Advertisement -

बाळू गवारे हे तहसील कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. गेल्या 35 वर्षांपासून त्यांनी आपले काम इमानेइतबारे केले. आज ते सेवानिवृत्त झाले असून तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी बाळूमामा यांना आपल्या खुर्चीत बसून त्यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदारांनी खुर्चीत बसवल्यानंतर मामा भारावून गेले होते.

Nashik Crime News : नाशिकमधील ‘त्या’ खुनाचा अखेर उलगडा

संपूर्ण दिवसभर ते तहसीलदार म्हणून तहसीलदारांच्या खुर्चीत बसले होते. तर तहसीलदार एकनाथ बंगाळे हे समोर बसून आपले दैनंदिन काम करत होते. तहसीलदारांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी नायब तहसीलदार सागर मुंदडा, संजय धनगर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik : भुसावळ आणि मनमाड रेल्वे पोलिसांनी केली ५९ बालकांची सुटका; काय आहे प्रकरण?

माझ्या जीवनातील ऐतिहासिक क्षण

जवळपास 35 वर्षे आपण तहसील कार्यालयात या खुर्चीची सेवा केली. या खुर्चीवर आज तहसीलदार साहेबांनी मला बसवून माझा सन्मान केला. हा माझ्या जीवनातील ऐतिहासिक क्षण आहे.

– बाळू गवारे.

- Advertisment -

ताज्या बातम्या