फटाक्यांना महागाईचा ‘बार’

40 टक्के दरवाढ; पावसामुळे व्यवसायाला फटका
फटाक्यांना महागाईचा ‘बार’

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

दिवाळीच्या (diwali) पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असताना यंदा फटाक्यांना महागाईचा (Inflation for firecrackers) फटका बसला आहे. सर्वच प्रकारच्या फटाक्यांच्या (firecrackers) दरात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्के वाढ झाली आहे.

म्हटले की फटाके हमखास येणारच. बच्चेकंपनीसह तरुणाईचा कल दिवाळीत फटाके (firecrackers) फोडून जल्लोष करण्याकडे असतो. मात्र, दररोज येणारा पाऊस (rain) या आनंदावर विरजण टाकू शकतो. त्यामुळे सर्वांचाच हिरमोड होण्याची शक्यता आहे. पावसाच्या गारव्याने फटाके सर्द पडत असल्याने व्यावसायिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

पाऊस सुरू असला तर फटाके कसे फोडणार? असाही प्रश्न नागरिकांना आहे. असे असले तरी यंदा फटाक्यांना मागणी अधिक असल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्यात फटाक्यांना महागाईचा (Inflation) फटका बसल्याने विक्रेत्यांमध्येही नाराजी आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच फटाक्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा बाजारात पर्यावरणपूरक फटाके (Eco Friendly Crackers) आल्याने ग्राहकांचाही याकडे कल दिसून येत आहे. यंदा निर्बंधमुक्त दिवाळी (diwali) साजरी होत असल्याने देवीरोड अन्य भागात फटाक्यांचे स्टॉल (firecracker stall) अधिक प्रमाणात लागले आहेत. मात्र, सतत होणार्‍या पावसामुळे ग्राहकांमध्ये फटाके खरदीसाठी द्विधा परिस्थिती निर्माण होत आहे.

व्यावसायिक चिंतेत

दिवाळीवर यंदा पावसाचे सावट असल्याने फटाके कमी प्रमाणात फोडण्यात येतील. त्यामुळे फटाक्यांची विक्री कमी झाली तर व्यावसायिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरातही मोठी वाढ झाल्याने विक्रेत्यांच्या यंदा घट झाली आहे. काही फटाक्यांचे दर वाढवून विकले जात असले तरी ग्राहकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दरवर्षी देवीरोड परिसरात आमचे फटाक्यांचे स्टॉल असतात. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्याने उत्साह अधिक आहे. मात्र, सतत होणार्‍या पावसाने ग्राहकांमध्येही खरेदीसाठी संभ्रम निर्माण होत आहे. यंदा दरात 40 टक्के वाढ झाल्याने नफा कमी झाला आहे.

- मयूर बलक, फटाके विक्रेते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com