Boat Accident : गंगा नदीत ४० जणांनी भरलेली बोट उलटली; चौघांना जलसमाधी, अनेक जण बेपत्ता

Boat Accident : गंगा नदीत ४० जणांनी भरलेली बोट उलटली; चौघांना जलसमाधी, अनेक जण बेपत्ता

बलिया | Ballia

उत्तर प्रदेशातील बलिया येथून गंगा नदीत ४० जणांना घेऊन जाणारी बोट उलटून मोठी दुर्घटना झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन डझनहून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलिया जिल्ह्यातील मालदेपूर गंगा घाट येथे ही घटना घडली, कुटुंबातील सदस्य मुंडन संस्कारासाठी जात होते. कुटुंबातील सर्व लोक बोटीतून जात असताना अचानक बोट उलटली.

Boat Accident : गंगा नदीत ४० जणांनी भरलेली बोट उलटली; चौघांना जलसमाधी, अनेक जण बेपत्ता
नगर-पुणे महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस उलटली

लोकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक मदतीसाठी धावले. अर्धा डझन लोकांना रुग्णालयात नेण्यात आले. तर 4 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यात येत होता. स्थानिक प्रशासनही घटनास्थळी पोहोचले आहे.

Boat Accident : गंगा नदीत ४० जणांनी भरलेली बोट उलटली; चौघांना जलसमाधी, अनेक जण बेपत्ता
धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

बातमी अपडेट होत आहे...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com