बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा शिंदे गटाला ‘ठाकरी टोला’

‘पंकज, आमच्या गटात या..’ सांगणार्‍या मध्यस्थाला अ‍ॅड. पंकज गोरे यांचे रोखठोक उत्तर
बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा शिंदे गटाला ‘ठाकरी टोला’

धुळे । Dhule । प्रतिनिधी

‘एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांमार्फत बोलतोय, युवा सेनेची (Yuva Sena) राज्यभर नवीन कार्यकारणी (New executive) करणे सुरु आहे. आपल्या सारख्या सक्रीय कार्यकर्त्याची आम्हाला गरज आहे. आमच्या गटात या (Join our group) मोठी जबाबदारी घेवून काम करण्याची चांगली संधी मिळेल...’ असे सांगणार्‍या मध्यस्थाला युवा सेनेचे जिल्हा अधिकारी (District Officer of Yuva Sena) अ‍ॅड. पंकज गोरे यांनी ठाकरी शैलीत (Thackeray style) रोखठोक सुनवले. (Resoundingly heard) इतके नव्हेतर त्यानेच शिंदे गटाच्या नादी लागू नये, असा सल्लाही दिला.

अ‍ॅड. पंकज गोरे
अ‍ॅड. पंकज गोरे

राज्यात शिवसेनेतून बाहेर पडून सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे नवीन पदाधिकारी नियुक्तीचे काम सुरु आहे. बाळासाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला पर्याय देण्याचा हा प्रयत्न आहे. एकीकडे आम्हीच खरे शिवसैनिक असा दावा केला जात असतांना शिंदे गटातर्फे भावनिक जाळे टाकून शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न होतो आहे. याचा प्रत्यय आज आला.

युवा सेनेचे धुळे जिल्हा अधिकारी अ‍ॅड. पंकज गोरे यांना शिंदे गटातून विराज मामूनकर यांनी भ्रमणध्वनद्वारे संपर्क साधला. कधी मित्र कधी बंधू म्हणत भावनिक मुद्दे उपस्थित करुन शिंदे गटात सहभागी होण्याचे आवाहन केले. इतके नव्हेतर युवा सेनेत मोठी जबाबदारी देण्याचे अमिषही दाखविले.

परंतू आमिषाला बळी न पडता अ‍ॅड. पंकज गोरे यांनी त्यांचे सर्व मुद्दे परतावून लावीत त्यांनी बाळासाहेबांशी, मातोश्रीशी कशी गद्दारी केली. उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मातोश्रीला कसा त्रास दिला. याबाबतचे ठोस मुद्दे उपस्थित करुन विराज मामूनकर यांचे सर्व मुद्दे त्यांच्याच घशात घातले.

अ‍ॅड. गोरे यांनी या चर्चेत काही प्रश्न उपस्थित केले. त्यांचे उत्तर मामूनकर यांच्याकडेही नव्हती. अ‍ॅड. गोरे म्हणाले स्वत:ला सामान्य म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे असो, गुलाबराव पाटील असो की दादा भूसे, यांना शिवसेनेने काय नाही दिले? अपेक्षेपेक्षा जास्त पदे, मंत्रीपदे आणि अधिकार दिलेत. विधी मंडळ, शिवसेनेचे आमदार सांभाळण्याचे सांगतांनाच निधी वाटपाची जबाबदारी देखील दिली. परंतू ठाकरे कुटुंबियांबद्दल जाणीपुर्वक गैरसमज पसरवून बुध्दीभेद करुन ते भाजपाच्या दावणीला बांधले गेलेत. आज भाजपा सांगेल तसे वागतात, बोलतात आणि वरुन निष्ठेची भाषाही करतात, हे शोभत नाही. पक्षाची घटना आणि संविधानातील कायदा त्यांना लवकरच त्यांची जागा दाखवेल.

सन 2019 च्या निवडणूकीत शिवसेना - भाजपाचे समसमान जागे ठरले असतांना सेनेला 135 वरुन 123 जागा मिळाल्या. मित्र पक्षांच्या नावे 18 जागांवर भाजपाने कमळाच्या चिन्हावर उमेदवार दिलेत. एवढे करुनही त्यांचे पोट भरले नाही म्हणून त्यांनी 70 ठिकाणी शिवसेना उमेदाराच्या विरोधात उमेदवार दिलेत. यात धुळ्याचाही समावेश होता.

सेनेचे तब्बल 60 उमेदवार भाजपाने पाडलेत. अन्यथा आज शिवसेना आमदारांची संख्या शंभरावून अधिक राहिली असती. हेच भाजपावाले ठाकरे कुटुंबियांवर टोकाचे आरोप करीत होते तेव्हा ही निष्ठावंत म्हणून घेणारे एकनाथ शिंदे आणि 40 आमदार कुठे होते? असा सवालही अ‍ॅड. गोरे यांनी केला. एकटे संजय राऊत या विरोधकांना अंगावर घेवून उत्तरे देत होते. आज त्यांच्याच नावाने ते बोटे मोडतात.

मंत्रीपदे घेवूनही गद्दारी करणारे आम्हीच बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक असल्याचे सांगतात. खरेतर त्यांना नैतिक अधिकारच नाही. बाळासाहेबांना आणि ठाकरे कुटुंबियांना वेदना देवून सेना संपवण्याच्या भाषा करणारे भविष्यात कुठे असतील? हे त्यांनाही सांगता येणार नाही. प्रसंगी घरी बसेल पण मातोश्रीशी गद्दारी ही माझ्या रक्तात नाही, ते कदापीही शक्य नाही, असेही अ‍ॅड. गोरे यांनी रोखठोकपणे सुनावले.

फोन करणार्‍या शिंदे गटाच्या विराज मामूनकर यांना त्यांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला. गैरसमजूतीतून वाट चुकली असेल तर परत फिरावे, असेही मित्रत्वाने सांगितले. त्यामुळे मामूनकर यांची पुरतीच बोलकी बंद झाली. ‘मी मत परिवर्तनासाठी फोन केला पण इथे माझेच मत परिवर्तन होते आहे.’ असेही त्यांनी याच संवादात मान्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com