बाळासाहेबांच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाला पाठवली ‘ही’ ३ चिन्ह

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाकडून (Election Commission) काल उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला नवं नाव आणि पक्षचिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला फक्त नाव मिळाले असून त्यांना अजूनही पक्षचिन्ह मिळालेले नाही. त्यानंतर आता शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही ३ पर्यायी चिन्ह पाठवली आहेत…

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव बहाल करण्यात आले आहे. मात्र, शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालेले नाही. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा असे चिन्ह दिले होते. परंतु आयोगाने ते रद्द ठरवले आहे.

तसेच त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्याने निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली. त्यानंतर शिंदे गटाला (Shinde Group) निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *