बालाकोट एअर स्ट्राइकचे हीरो अभिनंदन वीर चक्रने सन्मानित

बालाकोट एअर स्ट्राइकचे हीरो अभिनंदन वीर चक्रने सन्मानित

नवी दिल्ली:

बालाकोट एअर स्ट्राइकचे हीरो आणि पाकिस्तानचा F-16 फाइटर जेट पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना सोमवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीर चक्र देऊन सन्मानित केले.

बालाकोट एअर स्ट्राइकचे हीरो अभिनंदन वीर चक्रने सन्मानित
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर हल्ला करण्यास आलेल्या पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाचं अत्याधुनिक F-16 फाइटर जेट ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी पाडले होते. F-16 फाइटर जेट जमीनदोस्त केल्यानंतर अभिनंदन यांचं विमानदेखील कोसळलं. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले. मात्र सुदैवानं त्यांची सुटका झाली आणि ते सुखरुप मायदेशी परतले.

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जात होते. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर संतापलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. मात्र भारतीय हवाई दलानं त्यांना पिटाळून लावलं. याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन (आता ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत) पाकिस्तानचं एफ-१६ विमान जमीनदोस्त केलं. त्यानंतर त्यांचंही विमान कोसळलं. ते पाकव्याप्त काश्मीरमधील काही स्थानिकांच्या तावडीत सापडले. सुदैवानं त्यांची काही तासांमध्ये सुटका झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com