
नाशिक | प्रतिनिधी Nashik
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शासकीय कामात अडथळा आणि सहायक पोलिस आयुक्ताला अरेरावी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar )यांच्यासह दोघांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
सुधाकर बडगुजर यांच्यासह ज्ञानेश्वर वासुदेव बडगुजर आणि राकेश निंबा शिरसाठ अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात तिघांना एक वर्ष सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली, मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत उच्च न्यायालयात दावा दाखल करण्या करिता एक महिन्याचा अवधी देखील दिला आहे. .
बडगुजर यांनी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिह राजपूत यांच्याशी अरेरावी केली होती. याप्रकरणी बडगुजर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यातत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२४ एप्रिल २०१४ लोकसभा निवडणुकीत मतदान दिवशी रायगड चौक मतदान केंद्रावर वाद झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकत्यांवर लाठीचार्ज केला . याची पोलिसांकडे विचारणा केली असता यात त्यावेळी कोणताही दोष नसताना चुकीचा गुन्हा आमच्यावर दाखल केला . परंतु त्याच दिवशी पोलिसांनी शहरात १४ ठिकाणी सरकारी कामात अडथळाची गुन्हे दाखल केले . त्यात १३ निर्दोष सुटले . परंतु मला नैसर्गिक न्याय मिळाला नाही याची खंत आहे. नैसर्गिक न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्याय देवतेवर आमचा विश्वास असून मला न्याय मिळेल.
सुधाकर बडगुजर; शिवसेना महानगर प्रमुख ठाकरे गट