आनंदवली खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास जामीन ?

आनंदवली खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास जामीन ?
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आनंदवली खून प्रकरणातील ( Anandwali murder case )मुख्य सूत्रधार रम्मी राजपूत ( Rammi Rajput )यास तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय (Former Police Commissioner Deepak Pandey )यांनी मोक्काच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले होते मात्र पांडेय यांची बदली होते ना होते त्याचा अटीशर्थीवर जामीन ( Bail )झाल्याचे समजते.यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आनंदवली गाव येथे एका जमिनीच्या प्रकरणावरून 70 वर्षीय मंडलिक नामक एका वृद्धाचा खून झाला होता. प्रथम दर्शनी हे प्रकरण वेगळेच असल्याचे भासवण्यात आले होते मात्र तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सदर प्रकरण हे खुणाचेच असल्याचा निर्वाळा करून संघटित गुन्हेगारी रोखण्याकरिता सदर गुन्ह्यातील संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी यासाठी शासनाकडे पत्र लिहिले होते आणि त्यास दुजोरा देखील मिळाला होता.

सदर खून खटल्यातील मुख्य संशयित आरोपी रम्मी राजपूत याला हिमाचल मधून पोलिसांनी अटक करत नाशिक मध्ये आणले होते. संशयित राजपूत हा मध्यवर्ती कारागृह मध्ये असताना त्याला अंडासेल मध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची नाशिक मधून बदली झाली त्यानंतर अचानक काही अटी शर्तींवर रम्मी राजपूत याची जामिनावर मुक्तता करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांच्या माहितीवरून समजते.

आता नवनिर्वाचित पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हे संघटित गुन्हेगारी बद्दल काय भूमिका घेतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.