Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामविआची डोकेदुखी वाढणार; बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करणार?

मविआची डोकेदुखी वाढणार; बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करणार?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या (RajyaSabha) ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे…

- Advertisement -

तसेच सहावा उमेदवार (Candidate) जिंकून आणण्यासाठी मविआ (Mahavikas Aghadi) आणि भाजपला (BJP) छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता अधिक आहे.त्यातच आता राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) भाजपला मतदान (Voting) करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि त्यांच्या कुटूंबावर सध्या ईडीची (ED) टांगती तलवार असल्याने बविआ भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्यानंतर शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार (Vasai-Virar) आणि पालघरकडे (Palghar) वळवले आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यामध्ये (Palghar district) चांगलेच सक्रिय झाल्याने बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे.

दरम्यान, वसई-विरार महानगरपालिका (Vasai-Virar Municipal Corporation) निवडणूकीसाठी देखील शिवसेनेने (shivsena) कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. याचमुळे राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या