Video : बागलाण गुणवंतांची खाण : बद्र्रिके

दिमाखदार सोहळ्यात 'बागलाण दर्पण पुरस्काराचे वितरण
Video : बागलाण गुणवंतांची खाण : बद्र्रिके

सटाणा । प्रतिनिधी Satana

बागलाण तालुक्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध क्षेत्रात ऊतुंग कार्य करणार्‍या व्यक्तिमत्त्वे आहेत. हा भाग म्हणजे गुणवंतांची खाण आहे, अशा व्यक्तीमत्वांचा सन्मान करण्याची संधी दैनिक 'देशदूत'ने मला उपलब्ध करून दिली हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेता कुशल बद्रिेके(Actor Kushal Badrike ) यांनी केले.

दैनिक 'देशदूत' आयोजित व सटाणा शहरातील श्रीधर तात्या कोठावदे मित्र मंडळाच्या वतीने 'बागलाण दर्पण पुरस्कार-2023' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते कुशल बद्रिके उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते तालुक्यातील कृषी शैक्षणिक व्यापार उद्योजक व सामाजिक क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणार्‍या दगाजी सोनवणे, प्रमोद राका, अविनाश सावंत, आनंदा महाले, जयश्रीताई गरुड, केशवराव इंगळे, मुरलीधर मुसळे, निलेश चव्हाण, प्रशांत आंबेकर, पंढरीनाथ सोनवणे, केदा बापू भामरे, सुरज जाधव , सागर देवरे, पंडितराव पाटील, प्रभाकर रौदल, प्रशांत जाधव, शिवाजीराव सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

सटाणा शहरातील राधाई मंगल कार्यालय प्रांगणात आयोजित दिमाखदार सोहळ्यात बागलाण दर्पण पुरस्कार सिने अभिनेते कुशल बद्रिके, दैनिक देशदूत संपादक डॉ वैशाली बालाजीवाले, ज्येष्ठ सामाजिक नेते श्रीधर तात्या कोठावदे, आयवोक ऑप्टिशियंनचे संचालक कर्नल सिंह भट्टी, एस के डी ग्रुप चा संचालिका मीना देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज व देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाण तालुक्यातील भूमिपुत्रांचा दैनिक 'देशदूत'तर्फे बागलाण दर्पण सन्मान सोहळ्यात शहरातील राधाई मंगल कार्यालयाचे प्रांगण नागरिकांच्या उपस्थितीने अक्षरशा फुलून गेले होते . पुरस्कारथींच्या कार्याची माहिती देत त्यांच्या नावाची घोषणा होत असताना टाळ्यांच्या गजराने मैदान दणाणून सोडले होते. पुरस्कारार्थी खर्‍या अर्थाने बागलांचे दर्पण ठरले असल्याची साक्ष टाळ्यांच्या कडकडाद्वारे दिली जात होती.

उत्तर महाराष्ट्राचा विकासदूत ठरलेल्या दैनिक 'देशदूत'तर्फे यंदा प्रथमच तालुकास्तरावर 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' आयोजित करण्यात आला होता. वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासह प्रत्येक पिढी सोबत असलेले नाते अधिक वृद्धिंगत होण्याचा हेतू यामागे होता तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव होऊन त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य जगासमोर यावे यासाठी सटाणा शहरातील श्रीधर तात्या कोठावदे मित्र मंडळाने देखील या उपक्रमासाठी सक्रिय सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे नाशिक येथील आयवोक ऑप्टिशियन व देवळा येथील एस के डी ग्रुप मे देखील बागलाण तालुक्यातील कर्तुत्ववानांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी सक्रिय सहभाग घेतल्याने गत पंधरा दिवसापासून बागलाण तालुकाच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात बागलाण दर्पण पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंंगली होती.

प्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके व मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायिका अमृता खोडके दहिवेलकर यांच्या उपस्थितीने सोहळ्याची तरुणाईसह नागरिकांमध्ये कमालीची उत्कंठा वाढली होती . कार्यक्रम सहा वाजता सुरू होणार असला तरी पाच वाजेपासूनच राधा ही मंगल कार्यालय प्रांगण नागरिकांच्या गर्दीने फुलला होता. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांसह सटाणा शहर व बागलाण तालुका वासियांचे स्वागत दैनिक 'देशदूत' चे जाहिरात व्यवस्थापक अमोल घावरे सचिन कापडणी वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक मालेगाव कार्यालय प्रमुख हेमंत शुक्ला यांनी केल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देशदूत परिवारातील शशिकांत कापडणीस, निलेश गौतम, श्रीकांत रौंदळ, प्रशांत भामरे , दीपक सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे शुभी यांनी केले तर आभार संपादक वैशाली बालाजी वाले यांनी मानले. कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते.

रमेशदादा देवरे, डॉ. विलास बच्छाव, प्रकाश निकम, विश्वास चंद्रात्रे, यशवंत आहिरे, राजेंद्र राका, स्वप्नील बागड, जगदीश मुंडावरे, कैलास देवरे, महेश कोठावदे,संजय सोनवणे, परेश कोठावदे, रुपाली कोठावदे, केशव मांडवडे, धनंजय सोनवणे, साहेबराव गरुड,बाळासाहेब जगताप, पंढरीनाथ अमृतकार, वसंतराव सोनवणे, श्रुती निकम, श्रावणी कळसकर, तेजस्वी निकम, सोनाली मुंडावरे, निखिल सोनवणे, भालचंद्र कोठावदे, मुंजवाडच्या सरपंच यशश्री निलेश जगताप, सामाजीक कार्यकर्ते मोहन गवळी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

सुरेल गितांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

बागलाण पार्श्वगायिका अमृता खोडके दहिवेलकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने बागलाण दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित असलेल्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. चंद्रमुखी चित्रपटातील गाजलेल्या लावणीसह, टाइमपास मधील ही पोरगी साजुक ...तुपातील गीत सादर करत उपस्थितना थिरकण्यास भाग पाडले. आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा , मला लागला खोकला तसेच मला लागला नवर्‍याचा नाद हे गीत सादर करतात उपस्थितांनी सभागृह डोक्यावर घेतले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com