Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशसाईबाबांवरील प्रश्नावर बागेश्वर बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “गीदड की खाल…”

साईबाबांवरील प्रश्नावर बागेश्वर बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “गीदड की खाल…”

दिल्ली | Delhi

आपल्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांनी पुन्हा एकदा एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

साईबाबांवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जबलपूरच्या पनगर येथे श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी लोकांशी संवाद साधताना पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

“नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते…”; कालीचरण महाराज पुन्हा बरळले

या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांना सवाल करण्यात आला की, साईबाबांची पूजा करावी की करू नये? यावर शास्त्री म्हणाले, गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता. तसेच यावेळी शास्त्री यांनी साई बाबांना ईश्वर मानन्यास नकार दिला. आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही आणि शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट पाळणे हा प्रत्येक सनातनीचा धर्म आहे.

कारण ते आपल्या धर्माचे प्रमुख आहेत. कोणताही संत, मग तो गोस्वामी तुलसीदास जी असो वा सूरदास जी, तो संत, महापुरुष, युगपुरुष, युगपुरुष असतो. पण देव नसतो. लोक यावरुन वाद घालतील, पण हे सांगणेही अत्यंत गरजेचे आहे की, कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

PM मोदींची डिग्री शोधण्याचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाकडून रद्द, केजरीवालांना ठोठावला दंड

यापूर्वीही बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यं केल्याचे प्रकार घडले आहेत. राजस्थानच्या गांधी मैदानावर झालेल्या धर्मसभेत त्यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केले होते. ‘कुंभलगडमध्ये १०० हिरवे झेंडे आहेत, ते भगव्याने बदलले पाहिजेत. हा भगव्याचा देश आहे, ‘हिरव्या’चा नाही’, असे त्यांनी म्हटले होते.

यानंतर आता बागेश्वर बाबांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्रात साईबाबांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. परिणामी बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाणार का, हे पाहावे लागेल.

धक्कादायक! ५ वर्षीय मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या, पत्नीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न

दरम्यान, शंकराचार्य यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला होता. साईबाबांची पूजा करणं चुकीचं आहे. त्यांना देव मानणं चुकीचं आहे, असं शंकराचार्य म्हणाले होते. यावेळी त्यांनी साईबाबांच्या मंदिराच्या निर्मितीलाही विरोध केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या