Bad News # गणपती विसर्जनास गेलेल्या तरुणाचा जामनेर कांगनदी पात्रात बुडून मृत्यू

मुलाला वाचवण्यासाठी नदीत घेतली उडी, जामनेर शहरावर शोककळा
Bad News # गणपती विसर्जनास गेलेल्या तरुणाचा जामनेर कांगनदी  पात्रात बुडून मृत्यू

जामनेर Jamner प्रतिनिधी

येथील गणेशवाडी (Ganeshwadi) भागातील रहिवासी किशोर राजू माळी (Kishore Raju Mali) वय 30 हा घरी स्थापना केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन (Immersion of Ganesha idol) करण्यासाठी गेला असता बोदवड पुलाजवळ (Bodwad Bridge) काँग नदीपात्रात (Kong River Basin) त्याचा बुडून मृत्यू (death by drowning) झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर हा परिवारातील काही लहान मुलांसह बोदवड पुला जवळील कांगनदी पात्रात घरी स्थापन केलेला गणपती विसर्जन करण्यासाठी

गेला. याच दरम्यान इतरही काही लहान मुले नदीपात्रात गणेश विसर्जन करीत होते. एक मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किशोरच्या लक्षात आले व त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याने नदीत उडी घेतली. मुलाचे प्राण वाचविण्यात त्याला यश मिळाले परंतू स्वतःचा जीव वाचवण्यात तो अपयशी ठरला.

किशोरला पोहता येत नव्हते अशी माहिती समोर आली असून ज्या ठिकाणी त्याने उडी घेतली त्या नदीपात्रात मोठमोठे खड्डे असून पाणी मोठ्या प्रमाणावर होते. पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळे किशोर चा बुडून मृत्यू झाला.

सुमारे दीड तासाने त्याचा मृतदेह हाती लागला. किशोर यास दोन मुली असून आई-वडील व एक भाऊ आहे. घरातील तो कर्ता पुरुष होता .त्याचे जाण्याने संपूर्ण जामनेर शहरावर शोक कळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com