Saturday, April 27, 2024
HomeजळगावBad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठार

Bad News photos # पूणे मेहकर बसच्या अपघातात सहा जण ठार

शेगांव Shegaon प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आगाराच्या (Mehkar Agar) पूणे ते मेहकर (Pune to Mehkar Bus)या बसला (bus) आज सकाळी सहा वाजता सि.राजा तालुक्यातील पळसखेड चक्का जवळ समोरुन येणाऱ्या ट्रक ची (truck hit hard) जोरदार धडक लागून बसमधील ५ प्रवासी (passengers)व कंटेनर चालकासह (container driver) एकूण सहा जण या अपघातात (accident) ठार (killed) झाले आहेत.

- Advertisement -

मेहकर आगाराची बस (क्रमांक MH 40 Y 5802)पूणे ते मेहकर येताना आज सकाळी अंदाजे सहा वाजे दरम्यान सि.राजा तालुक्यातील पळसखेड चक्का जवळ एस.टी.बस व समोरून येणाऱ्या कंटेनर(क्रमांक OD 11S 1657)ची जोरदार धडक होऊन बसचा चालक राजू तुकाराम कुलाल(४२,वडगाव तेजन,ता.लोणार जि.बुलढाणा),प्रवासी शेषराव उत्तमराव खराबे(६५,अंत्री देशमुख, ता.मेहकर जि.बुलढाणा),गोकर्णा रामदास खिल्लारे(५५,केळवद,ता.चिखली जि.बुलढाणा),वनमाला किशोर पवार(३०,बेलगाव,ता.मेहकर जि.बुलढाणा),सीमा सोमेश्वर जोशी(४५,मेहकर जि.बुलढाणा)व कंटेनर चालक हे या अपघातात ठार झाले आहेत.

तर २६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात प्रभाकर मुंढे(दुसरबीड),अखिलेश ढाकरके(मेहकर),प्रल्हाद देशमुख(दुसरबीड),लीलाबाई माने(मेहकर),अगस्त माने(मेहकर),शितल माने(मेहकर),लीलाबाई अग्रवाल(मेहकर),सै.बीबन सै.बु-हान(सि.राजा),वैष्णवी वाघ,ओम वाघ(दुसरबीड),राहुल मोरे(अंजनी),योगेश जुमडे(दुसरबीड),जीवन डेरे(राजेगाव),अर्चना ढाकरके(मेहकर),विकास व्यवहारे(मेहकर),हर्षदा पाटोळे(लोणार),सुनील वाघ(दुसरबीड),सुनिता लव्हाळे( लव्हाळा),मंजुषा शिरके(पूणे),वत्सला चव्हाण(कारेगाव),जया पाटोळे,श्वेता पाटोळे, सार्थक पाटोळे(मेहकर),विलास दुबे(हजारी बाग),गायत्री तहकीत(मेहकर),रूखमीना वाघ(सि.राजा) अशी जखमीची नावे असल्याची माहिती एस.टी.प्रशासनाकडून मिळाली आहे.

अपघात घडताच सि.राजा पोलीस निरीक्षक केशव वाघ,पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप,कर्मचारी विनायक टेकाळे,प्रभाकर सानप,संदीप डोंगरे,मदन मुळे,श्रावण डोंगरे,विजय बहीर,कि.राजा पोलीस निरीक्षक युवराज रबडे व पोलीस कर्मचारी, मेहकर एस.टी.आगार प्रमुख संतोष जोगदंडे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक अक्षय वानखेडे, सि.राजा एस.टी. कंट्रोलर डी.एस.झिने,जी.डी.हिवाळे,मेहकर आगाराचे प्रविण तांगडे, अंकुश शिंदे,के.ए.घुगे आदी घटनास्थळी व रूग्णालयात जाऊन पाहणी व मदत केली. दुपारी १ वाजेपर्यंत सि.राजा पोलीस कडून कंटेनर चालकाचे नाव मिळू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या