
दिल्ली | Delhi
सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला आता पुन्हा महागाईची झळ बसणार आहे. तेल कंपन्यांनी एलपीजीच्या व्यावसायीक सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. तब्बल सात रुपयांनी ही वाढ केली असून खाद्य पदार्थांचे दर देखील यामुळे वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० इतकी झाली आहे. सुदैवाने तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केला नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत या पूर्वी एप्रिल, मे आणि जूनमध्ये कपात करण्यात आली होती. यानंतर मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यानंतर आज ७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.