पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे तडजोड, शिवसेना नेत्याचे वक्तव्य

पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे तडजोड, शिवसेना नेत्याचे वक्तव्य
शरद पवार

शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. परंतु त्यावर टीका-टिपन्नी होत असते. आता शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते (Anant Geete) यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे वक्तव्य केले आहे. अनंत गिते यांनी थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. यावेळी शिवसेनेने त्यांचा वक्तव्याचा पक्षाशी संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे.

 शरद पवार
धमाका होणार; तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात, हे आहेत १५ जण

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलतांना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर फक्त मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये... आघाडी आघाडीचं पाहून घेईल.

राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे.

संजय राऊत म्हणाले...

अनंत गिते यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, मला विषय माहित नाही, पवार साहेब आणि ठाकरे राज्याचे नेते आहेत. गितेंच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार उद्धव ठाकरे चालवताहेत. सर्वांनीच ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले आहे

Related Stories

No stories found.