Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबच्चू कडू म्हणतात, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, मात्र...

बच्चू कडू म्हणतात, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, मात्र…

अमरावती | Amravati

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना न्यायालयाने (Court) दोन महिने सश्रम कारावासाची (Rigorous Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने जाहीर केला आहे…

- Advertisement -

कोर्टाच्या (Court) या निर्णयावर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 2014 च्या गोदर आमदारांच्या घरासाठी सोसायटी करण्यात आली होती. शासनाने सर्व आमदारांच्या घरांच्या कर्जाची हमी घेतली होती. त्याच घरांवर आपण कर्ज काढले होते. कर्जाची रक्कम निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास

मात्र घराचा क्रमांक कळवला नाही. कर्जाचे घर असल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे. ती जी काही चूक झाली होती, ती काही जाणीवपूर्वक केली नव्हती. न्यायालयाचा निर्णय जरी चूक असला तरी मी न्यायालयाने जो निर्णय दिला आहे स्वागत करतो.

एसटी विलिनीकरण अहवालासाठी राज्य सरकारला वाढीव मुदत; हायकोर्टाचे निर्देश

सूड भावनेने माझ्यावर तक्रार दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आम्ही वरील न्यायालयात दाद मागू, ते आम्हाला न्याय देतील असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी मुंबई (Mumbai) येथील फ्लॅटबाबत माहिती लपवली. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) यांनी 2017 साली बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती.

वाईन विक्रीचा वाद हायकोर्टात; राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान

या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. आज कोर्टाने बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची (Rigorous imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या