Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास

अमरावती | Amravati

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना न्यायालयाने (Court) दोन महिने सश्रम कारावासाची (Rigorous Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने जाहीर केला आहे…

- Advertisement -

2014 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी मुंबई (Mumbai) येथील फ्लॅटबाबत माहिती लपवली. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) यांनी 2017 साली बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती.

Video : लतादीदी नेहमीच राहतील स्मरणात! नाशिककर भावूक

बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly elections) या फ्लॅटबाबतची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता.

Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात…

याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तक्रार करणारे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळवली होती. त्यातून हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.

अशी आहे मुकेश अंबानींची नवी कोरी ‘रॉल्स रॉयस’ अलिशान कार

त्यावेळी बच्चू कडू यांनी या प्रकरणातील सर्वा आरोप फेटाळून लावले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा (Loan) उपलब्ध करुन देण्यात आले होते.

नितेश राणे दोन दिवसांच्या आरामासाठी गोव्यात; मोदींना भेटण्याची शक्यता

मात्र कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी केला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते, असे स्पष्टीकरण बच्चू कडूंनी 2017 मध्ये केले होते. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. आज कोर्टाने बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची (Rigorous imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

- Advertisment -

ताज्या बातम्या