'आजमगड'मध्ये 'श्रद्धा' प्रकरणाची पुनरावृत्ती; प्रेयसीची निर्घृण हत्या करत मृतदेहाचे तुकडे...

'आजमगड'मध्ये 'श्रद्धा' प्रकरणाची पुनरावृत्ती; प्रेयसीची निर्घृण हत्या करत मृतदेहाचे तुकडे...

दिल्ली | Delhi

सध्या देशात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची भरपूर चर्चा आहे. महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. तिचा प्रियकर आफताब आमीन पुनावाला (Aftab Poonawala) याने तिची आधी हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली.

ही घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्येही धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांनतर तरुणीने लग्नाला नकार दिल्याने नराधम प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केली. प्रिंस असं आरोपीचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी आझमगडमधील एका गावातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. या मृतदेहाचे ५ तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणी तपास सुरू असताना तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याच उघडकीस आले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तपासासाठी त्याच्यासह घटनास्थळी गेले. त्यावेळी त्याठिकाणी लपवून ठेवलेल्या गावठी बंदुकीतून आरोपीन पोलिसावर गोळीबार केला. त्यामध्येच आरोपी जखमी झाला. दरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीला अटक केली.

आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर या निर्घृण हत्येचा उलगडा झाला आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसानी मृतदेहाचं शीर ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आरोपीन आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा कबुली जबाब दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com