केंद्राची परवानगी : आता आयुर्वेदीक डॉक्टर करणार शस्त्रक्रिया

राष्ट्रीय डॉक्टर दिवस
राष्ट्रीय डॉक्टर दिवस

नवी दिल्ली :

केंद्र सरकारने डॉक्टरांसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आयुर्वेदीक डॉक्टर आता काही प्रकारच्या शस्त्रक्रिया करु शकणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने 19 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार, आयुर्वेदाच्या पीजी अभ्यासात आता शस्त्रक्रियांचा अभ्यासक्रमही जोडण्यात येणार आहे. त्याचसोबत कायद्याचे नाव बदलून भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदसंशोधन विनियम, 2020 असे ठेवण्यात आले आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आता आयुर्वेदीक डॉक्टर्सही शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आयुर्वेदातील पीजी विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या शस्त्रक्रिया करतील

आयुर्वेदीक डॉक्टर्स हाडांचे आजार, डोळ्यांचे विकार, नाक-कान-घसा आणि दातांशी निगडीत शस्त्रक्रिया करू शकणार आहेत.

सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या अध्यक्षांनी सांगितलं की, आयुर्वेदाच्या संस्थांनांमध्ये अशा सर्जरी गेल्या 25 वर्षांपासून केल्या जात आहेत. अधिसूचनेत केवळ हे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा शस्त्रक्रिया करणं वैध असणार आहे.

आयएमएचा विरोध

इंडियन मेडिकल असोसिएशनचे मत थोडे वेगळे आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांचे म्हणणे आहे की, यामुळे डॉक्टरांमध्ये खिचडीसारखी परिस्थिती निर्माण होईल. या निर्णयामुळे देशात संमिश्र परिस्थितीमुळे हायब्रिड डॉक्टरांना प्रोत्साहन मिळेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com