Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhoto: अयोध्या भव्य दिवाळीला सुरुवात : लेजर शो अन् दिव्यांचा विश्वविक्रम

Photo: अयोध्या भव्य दिवाळीला सुरुवात : लेजर शो अन् दिव्यांचा विश्वविक्रम

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

रामपडीतील घाटांवर नऊ लाख दिवे लावण्यात आले आहेत. तसेच ‌भव्य लेजर शोही करण्यात येत असून देश-विदेशातून अनेक पर्यटक अयोध्येत दाखल झाले आहे.

- Advertisement -

भगवान श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी दीपोत्सवात ९ लाख दिव्यांनी शरयूचा शृंगार होणार आहे. तसेच अयोध्येतील प्राचीन मठ मंदिर आणि कुंडावर ३ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

एकूण १२ लाख दिव्यांनी अयोध्या उजाळणार आहे. मागील वर्षी दिवाळीला ६ लाख दिवे लावण्यात आले होते. आता १२ लाख दिवे लावून विश्वविक्रम करण्यात येणार आहे.

मंदिरांतील दीपोत्सवाची सुरुवात मंगळवारी धनत्रयोदशीने झाली. यम द्वितीयेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. रामलल्लाचा दरबार झेंडू, गुलाब आणि मोगरा यांनी सजवला गेला आहे. रामललाच्या दरबारासमोर रांगोळी काढली जात आहे.

रामलल्लासमोर देशी तुपाचे ५१ दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. रामलल्लाचे प्रमुख आचार्य सत्येंद्रदास यांनी सांगितले की, रामलल्ला आणि भगवान हनुमान यांच्यासह चार भावांना नवीन वस्त्र आणि दागिन्यांनी सजवले जाईल. ४ नोव्हेंबर रोजी अन्नकूटवर ५६ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जाईल.

अयोध्येत कार्तिक कृष्ण चतुर्दशीला हनुमान जयंती साजरी करण्याची प्राचीन परंपरा आहे. जयंती 3 नोव्हेंबरला आहे. या तारखेला मध्यरात्री हनुमान प्रकट होतात. मंदिराच्या गर्भगृहात देवाला सोन्या-चांदी आणि हिऱ्यांनी सजवले जाते.

रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी व पूजेसाठी मंदिरात उपस्थित राहतात. मंदिरात अखंड रामायणाचे पठण सुरू असल्याचे मंदिराचे महंत ग्यानदास यांनी सांगितले. 3 नोव्हेंबर रोजी रामकथा भागाचे प्रवचन होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी अन्नकूट होणार आहे.

दीपावलीच्या सणावर भगवान श्री राम आणि जानकी यांना विशेष अभिषेक केला जातो. त्यांना दिव्य वस्त्र आणि दागिने घातले जातात. पुजारी अजय द्विवेदी यांनी सांगितले की, माता छोटी देवकाली ही येथील ग्रामदेवी आहे. असे मानले जाते की माता सीता आजही मंदिरात पूजेसाठी येतात. जानकी वनवासातून अयोध्येत परतल्याच्या आनंदात दिवाळीला देवकाली मातेचा श्रृंगार आणि भव्य आरती होते. रात्रभर येथे भाविक ध्यान करतात.

पुजारी विजय उपाध्याय यांनी सांगितले की, दिवाळीला 12 प्रकारच्या पानांची देवाची पूजा केली जाते. भगवान नागेश्वरनाथाचा पंचमुखी श्रृंगार केला जातो. असे मानले जाते की भगवान श्रीरामाचा पुत्र कुश याने नागेश्वरनाथ भगवानांची स्थापना केली. येथे रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या उपस्थितीत नागेश्वरनाथाची पूजा केली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या