Breaking # तमाशात नाचणार्‍या सहाय्यक फौजदारावर निलंबनाची कुर्‍हाड

पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश; आणखी एक कर्मचारी रडारवर
Breaking # तमाशात नाचणार्‍या सहाय्यक फौजदारावर निलंबनाची कुर्‍हाड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात पोलिसांच्या (police) आश्रयामुळेच अवैध धंदे (Illegal business) सुरु असल्याच्या अनेक घटना (event) उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, जळगाव तालुक्यातील खेडी बु. येथे तमाशाच्या फडात (midst of a spectacle) थेट स्टेजवर नाचणार्‍या (Dancing on stage) पोलिस कर्मचार्‍याचा (police officer) व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला होता. यात नाचणारा सहाय्यक फौजदार भटू विरभान नेरकर याच्यावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Superintendent Police Dr. Praveen Mundhe) यांनी निलंबनाची कारवाई (Action of suspension) केली असून याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.

जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांचे पोलिसांसोबत असलेल्या हितससंबंधांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. अवैध वाळू वाहतूक, हातभट्टी दारु विक्रेत्यांसह अनेक अवैध धंदेवाल्यांसोबत पोलिसांचे संबंध असून त्यांच्यासोबतचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात शहरातील निवृत्ती नगरात वाळू व्यावसायातील वर्चस्वाच्या वादातून भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे) या तरुणावर 24 वार करीत अत्यंत निर्दयीपणे निर्घृन खून केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी भूषण रघुनाथ सपकाळे (वय-32, रा. खेडी खुर्द) व मनिष नरेंद्र पाटील (वय-22, रा. आव्हाणे) या दोघ संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील संशयितांकडून खुनाच्या घटनेच्या काही दिवसांअगोदर गावात तशामा आयोजीत केला होता.

अन् आणखी एक कर्मचारी रडारवर

तमाशात हजेरी लावून वाळू व्यावसायिकांसोबत नाचणारा तसेच वाळू व्यावसायीकांशी हितसंबंध जपणार्‍या तालुका पोलीस ठाण्यातील एक कर्मचार्‍याची याचप्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. तसेच तो कर्मचारी देखील कारवाईच्या रडारवर असून त्यावर देखील लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ

पोलीसांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे संबंध अनेक घटनांतून उघड झाले आहे. अशा कर्मचार्‍यांकडून पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी कारवाईचे अस्त्र उगारले आहे. निलंबनाच्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांशी संबंध असलेल्या कर्मचार्‍यांचे चांगले धाबे दणाणले असून पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.

व्हिडीओची चौकशी करीत कारवाई

वाळू व्यावसायीकांनी आयोजीत केलेल्या तशामाला पोलीस मुख्यालयातील कर्मचारी भटू नेरकर व तालुका पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने हजेरी लावली होती. या तमाशाच्या फडात दोघांनी स्टेजवर ठेका देखील धरला असल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. नाचतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन संबंधित पोलिस कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, चौकशीअंतीच सहाय्यक फौजदार भटू नेरकर याला निलंबित करण्यता आले आहे.

यापुर्वीही झाले होते निलंबन

अवैध धंदेवाल्यांशी संबंध ठेवून त्यांचा पोलीस मुख्यालयाच्या आवारात वाढदिवस साजरा करणार्‍या विनोद चौधरी या पोलीस कर्मचार्‍याला तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले होते. तसेच भटू नेरकर यांच्यावर यापुर्वी देखील एकदा निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा कर्तव्यावर रुजू करुन त्यांची यावल येथे बदली केली होती.

मात्र, पुन्हा त्यांना पोलीस मुख्यालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, नेरकर यांच्यावर ही दुसर्‍यांदा निलंबनाची कुर्‍हाड कोसळली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारावर चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवालावरुनच प्राथमिक स्वरुपात संबंधित पोलीस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश देखील काढले आहेत. डॉ.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com