दै.'देशदूत'च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांना पुरस्कार जाहीर

14 महिलांचा होणार नवदुर्गा सन्मान सोहळा
 दै.'देशदूत'च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांना पुरस्कार जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nasik

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांची विशेष दखल घेण्यात आली असून यंंदाच्या नवरात्रोत्सवात नारीशक्तीला वंदन करण्यासाठी नवदुर्गा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. दै.'देशदूत'च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांच्यासह समाजातील 14 महिलांचा नवदुर्गा सन्मान सोहळा येत्या गुरुवारी (दि. 19) होणार आहे.याबाबत आज रा. स्व. संघाची पत्रकार परिषद झाली. त्यात शहर संघचालक विजयराव कदम यांनी नवदुर्गा सन्मान पुरस्कारांची घोेषणा केली.

यंदाचा पुरस्कार दै.'देशदूत'च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवालेे यांच्यासह पूजा खैरनार, अनिता जोशी, पल्लवी पटवर्धन, जयंती विश्वनाथन, जुही पेठे, माधवी साळवे, अश्विनी देवरे, श्रुती देव, भाग्यश्री शिर्के, उद्योजिका मनीषा धात्रक, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांंगणेे, डॉ. श्रिया देवचके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंंदा पाटील यांंना जाहीर झाला आहे.

गुरुवारी सांयंंकाळी साडेपाचला कुर्तकोटी सभागृहात लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांच्या हस्ते व साप्ताहीक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांंच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार आहे, असे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शहर सघंचालक डॉ. विजय मालपाठक, ग्रामीण संघचालक साहेबराव पाटील, सुहास वैद्य, प्रकाश जोशी, विवेक सराफ, सुरेश गायधनी, सतीश महोळ, समृध्द मोगल, अनील दहीया, डॉ. प्राची कुलकर्णी, मिलिंद खादवे, मकरंंद धर्माधिकारी उपस्थित होते.

समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाने विशेष ठसा उंमटवणार्‍या महिलांंचा यथोचित सन्मान व्हावा, त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी सामाजिक बांंधीलकीतून हा सोहळा आयोजित केल्याचे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com