दै. ’देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांना पुरस्कार जाहीर

दै. ’देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांना पुरस्कार जाहीर

पुणे। प्रतिनिधी Pune

विश्व संवाद केंद्र ( Vishva Samvad Kendra )आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी (Deccan Education Society )यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणारा 'आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' (Devarshi Narad Journalism Award) यावर्षी दैनिक 'देशदूत'च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले (Executive Editor of Daily 'Deshdoot' Dr. Vaishali Balajiwale)यांना घोषित झाला आहे. या पुरस्कारांची घोषणा आज विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार मानकऱ्यांमध्ये 'लोकमत'चे समूह संपादक विजय बाविस्कर, 'टाईम्स ऑफ इंडिया’ पुण्याचे उपनिवासी संपादक अभिजित अत्रे, ’केसरी’च्या कोल्हापूर ब्यूरो चीफ अश्विनी टेंबे, 'महाराष्ट्र टाईम्स' पिंपरी-चिंचवडचे विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे आणि 'सकाळ' पुणे कार्यकारी संपादक शीतल पवार यांची आश्वासक पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सांगलीचे आदित्य वेल्हाळ आणि पुण्यातील 'टाईम्स नाऊ वाहिनी'चे व्हिडिओ जर्नलिस्ट रूख्मांगद पोतदार यांना छायाचित्रकार तसेच पुण्याचे घनश्याम देशमुख यांना व्यंगचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सोशल मीडिया पुरस्कारांसाठी नाशिकच्या 'द फोकस इंडिया'चे संपादक विनायक ढेरे, पुण्यातील अमित परांजपे आणि सांगलीतील विनीता तेलंग या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची निवड झाली आहे.

पुरस्कार वितरण समारंभ येत्या शनिवारी, २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फीथिएटरमध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे राहतील. पुरस्कार उपक्रमाचे यंदा ११ वे वर्ष आहे. देवर्षी नारद जयंतीनिमित्त हे पुरस्कार दिले जातात.

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. करोना महामारीमुळे गेली २ वर्षे हा पुरस्कार कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्षासाठी ज्येष्ठ पत्रकार, आश्वासक पत्रकार, छायाचित्रकार/व्यंगचित्रकार आणि सोशल मीडिया या वर्गातून पुरस्कार देण्यात येणार आहेत.

यापूर्वी 'एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, 'झी २४ तास'चे डॉ. उदय निरगुडकर, 'तरुण भारत' बेळगावचे संपादक किरण ठाकूर, 'दिव्य मराठी'चे संपादक प्रशांत दीक्षित, 'महाराष्ट्र टाईम्स'चे संपादक पराग करंदीकर, 'लोकसत्ता' पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व 'आज का आनंद'चे संपादक श्याम अग्रवाल आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com