Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआनंदावर करोनाचे विरजण टाळा : पंतप्रधान मोदी

आनंदावर करोनाचे विरजण टाळा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

देशातील लसीकरण, करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राने केलेले प्रयत्न आणि ओमिक्रॉन विषाणूचे नवे आव्हान ओळखून सतर्क राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना केले. बरेच लोक सध्या सुट्टीवर आहेत किंवा ख्रिसमस आणि नववर्षात सुट्टीवर जातील. आपला सुटीचा आणि सणाचा आनंदावर विरजण पडू नये म्हणून नागरिकांनी तोंडावर मास्क घालणे आणि हात धुण्यासारख्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. मोदी यांच्या मन की बात चा हा 84 वा भाग होता. 2022 या सालातील त्यांचा हा शेवटचा कार्यक्रम होता.

चीनसह काही देशांत पुन्हा करोना संंसर्गाचा वेगाने फैलाव होत आहे.त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी करोनाबाबत आजच्या कार्यक्रमात जनजागरण केले. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. जगातील गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा आपण समर्थपणे सामना केला. 100 कोटी लसीकरणाचा टप्पाही देशाने पूर्ण केला.

आता करोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा नवा विषाणू आला आहे. त्यामुळे आपल्याला जबाबदारीने वागावे लागेल. ङ्गओमिक्रॉनफचा संसर्ग रोखण्याच्या निश्चयासह आपल्याला नव्या 2023 वर्षात प्रवेश करायचा आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेल्या 14 जणांना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. वरुण सिंग यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख त्यांनी केला.

कॅप्टन वरुण सिंग यांनी लिहिलेले पत्र प्रत्येक भारतीयाला, भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल. दरवर्षी मी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. यावर्षी संवाद साधण्यासाठी 28 डिसेंबर ते 20 जानेवारीदरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन मोदी यांनी केले. कॅप्टन वरुण सिंग यांनी प्रत्येक भारतीयाला, भारतातील प्रत्येक नागरिकाला, विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल. दरवर्षी मी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो.

यावर्षी देखील संवाद साधण्यासाठी 28 डिसेंबर ते 20 जानेवारी दरम्यान नोंदणी करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेल्या 14 जणांना आदरांजली केली. वरुण सिंग यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संवादामध्ये केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या