क्रिकेट विश्वात शोककळा! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

क्रिकेट विश्वात शोककळा! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघाती निधन

दिल्ली | Delhi

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू (Australian Cricket legend) अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) रस्ता अपघातात (tragic car accident) मृत्यू झाला आहे.

अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा शनिवारी रात्री टाऊन्सव्हिले येथे अपघतात झाला. गंभीर जखमी झालेल्या सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, मात्र यश आलं नाही.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात . यावेळी सायमंड्स कारमध्ये एकटाच होता. अपघातामुळे सायमंड्सला गंभीर दुखापती झाल्या. घटनेनंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले.

Related Stories

No stories found.