ICC Women's T20 World Cup 2023: आज भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना

ICC Women's T20 World Cup 2023: आज भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना

मुंबई | Mumbai

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) १० फेब्रुवारीपासून महिला टी२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिलांचा सलामी सामना पाकिस्तान (Pakistan) संघाशी होणार आहे....

तत्पूर्वी आजपासून म्हणजेच ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान सराव सामना होणार आहे. आज भारतीय महिलासंघाचा (Women's team) सराव सामना ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्या असणार आहे, तर स्मुर्ती मंधाना उपकर्णधार असणार आहेत. विशेष म्हणजे महिला टी२० वर्ल्डकप स्पर्धेचा हा आठवा हंगाम असणार आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने गतवेळी झालेल्या महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत आपले विजेतेपद कायम राखण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा मानस असणार आहे. शेफाली वर्माच्या (Shefali Verma) नेतृत्वात अंतिम सामन्यात इंग्लंड संघावर विजय संपादन करून अंडर१९ महिला संघाने विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे त्यामुळे महिला संघाला यामाध्यमातून बळ मिळाले आहे.

आता हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वात टी२० वर्ल्डकप पटकावण्यासाठी इंडिया वूमेन मैदानात उतरणार आहे. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर मात करून पाकिस्तान संघाविरुद्ध आत्मविश्वासाने उतरण्यासाठी भारतीय महिला संघाचा इरादा असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com