Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशहरानंतर आता जिल्ह्याचंही नामांतर; 'छत्रपती संभाजीनगर', 'धाराशिव'वर शिक्कामोर्तब

शहरानंतर आता जिल्ह्याचंही नामांतर; ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’वर शिक्कामोर्तब

मुंबई | Mumbai

छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीआधीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचंही नाव छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) करण्यात आलं आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच याबाबतची घोषणा करणार आहे.

विशेष बाब म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं. परंतु मात्र सरकारने राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलली आहे. त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या