Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रनाथांच्या नगरीत भक्तीचा सागर! नाथ षष्ठी यात्रा सुरू, लाखो भाविक दाखल

नाथांच्या नगरीत भक्तीचा सागर! नाथ षष्ठी यात्रा सुरू, लाखो भाविक दाखल

पैठण | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पंढरपूर (Pandharpur) नंतर मानला जाणार सर्वांत मोठा यात्रा उत्सव श्री क्षेत्र पैठण येथे आज (बुधवार) पासून श्री संत एकनाथ महाराज षष्ठी (Eknath Shashthi 2022) सोहळ्याला सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी डॉ. सुनिल चव्हाण सह पत्नी कांचन सुनिल चव्हाण यांच्या हस्ते संत एकनाथ महाराजच्या समाधी मंदिरात महाअभिषेक व आरती करून प्रारंभ झाला.

- Advertisement -

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुनिल चव्हाण यांच्या सह पत्नी, नाथ विश्वस्त दादा बारे यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार डी. बी.निलावड, नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आंगळे, नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी, शहादेव लोहारे यांची उपस्थिती होती.

वर्षांपासून खंडित असलेल्या संत एकनाथ महाराज नाथषष्ठीत सहभागी होण्यासाठी यंदा लाखो भाविक भक्त पैठण नगरीत दाखल झाले असून षष्ठीच्या पहिल्याच दिवशी पहाटे चार वाजेपासून नाथदर्शन, नाथसागरावर स्नानासाठी भाविकांच्या रेकॉर्ड ब्रेक नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून पहाटे नाथवाड्यातील विजयी पांडुरंग तसेच नाथ समाधी पादुकेचा अभिषेक करण्यात आला.

शहरात प्रवेश करणाऱ्या हजारो दिंडीचे स्वागत उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे , मुख्याधिकारी संतोष मंदिर अशी नाथवंशजांची मानाच्या दिंडीचे प्रस्तान झाले असून वाळवंट फडातील तील दिंडी प्रमुखांचे यावेळी अक्षदा देऊन निमंत्रण देण्यात येत आहे. दोन वर्षापासून स्थगित असलेल्या या यात्रेला मुकलेल्या नाथभक्त यंदा हजारो दिंड्या सह नाथदर्शनासाठी आतुर झाले आहेत.

नाथ दर्शनासाठी नाथ मंदिर ते खंडोबा मंदिरापर्यंत दर्शन रांगा लागल्या आहेत. नागघाट ते नाथसागर परिसरात दिंड्यांच्या हजारो राहुट्यात नाथनामाचा गजर घुमत आहे. ईदगाह, जांभूळबन तसेच संतपीठ आवारात रात्री विद्युत व्यवस्था नसल्याने हजारो भक्तांनी अंधारात रात्र काढली. प्रशासनाने याठिकाणी तात्काळ विद्युत सेवा, पिण्याच्या पाणीची सेवा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी तमाम पैठणकर सरसावले असून मोफत पाणी, अल्पोपहार, जेवण आणि ईतर सेवा पुरवण्यात स्थानिक नागरिक हिराईने सहभाग घेत आहेत. संपूर्ण यात्रा परीसरात तात्पुरते टॅक शौचालय नसल्याने प्रांतविधी साठी भक्तांची कुचंबणा झाली. एकंदरीत पैठणनगरीत लाखोंच्या संख्येने नाथभक्त सहभागी झाले असून पैठण नगरीत भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ नामाचा गजर होत आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या