राज्याच्या राजकारणात नवी चर्चा; MIM महाविकास आघाडीसोबत जाणार?

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

भाजपला (BJP) हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असा नारा काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला होता. यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील अशीच भूमिका मांडली होती. त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत एमआयएमने (MIM) राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे.

राज्यात माहाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt) आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणत एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भविष्यात एमआयएम महाविकासआघाडीत सहभागी होणार का? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. तसेच शरद पवारांपर्यंत आमचा निरोप पोहोचवा, अशी विनंती देखील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना (Rajesh Tope) केली आहे.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, एमआयएमवर वारंवार आरोप केला जातो की, आमच्यामुळे भाजपा जिंकून येते. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आम्ही समाजवादी पार्टी (SP) आणि बहुजन समाजवादी पार्टी (BSP) या दोन्ही पक्षांना ऑफर दिली होती. तुम्हालाही भाजपला हरवायचे आहे आणि आम्हाचेही उद्दिष्ट हेच आहे की, या देशातून भारतीय जनता पार्टीला नष्ट करायचे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच आरोप केले आहेत की, एमआयएममुळे भाजपाला मते मिळतात. त्यामुळे आता आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *