Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याइंदुरीकर महाराज गोत्यात! 'त्या' विधानावरून न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश, अडचणी वाढल्या

इंदुरीकर महाराज गोत्यात! ‘त्या’ विधानावरून न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश, अडचणी वाढल्या

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांना त्यांचं वक्तव्य महाग पडलं आहे. एका वक्तव्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.

- Advertisement -

इंदुरीकर महाराज हे त्यांच्या खास शैलीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनाला संपूर्ण राज्यातून मोठी मागणी असते. खास ग्रामीण शैलीत ते श्रोत्यांशी संवाद साधतात आणि लोकांचं प्रबोधन करतात. अशाच एका प्रवचनाच्या वेळी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्माविषयी एक विधान केलं होतं. सम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगी होते, असं ते म्हणाले होते.

युतीमधील तणाव वाढला? अनिल बोंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिंदे गटाचे आमदार भडकले

इंदुरीकरांचं हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली. त्यांच्या विरोधात अंनिस व जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात गेलं. कनिष्ठ न्यायालयानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयानं हा गुन्हा रद्द केला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य सरकारनं उच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठापुढं होतं. त्यावर आज निकाल देत न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं इंदुरीकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Video : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री ED च्या कचाट्यात, बेड्या पडताच ढसाढसा रडले… नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. इंदुरीकरांच्या कीर्तन कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी त्यांना समर्थन देणारे फलकही झळकावले होते.’आमचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा’ अशी मोहीमच सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर समर्थकांनी इंदुरीकर महाराजांसाठी आंदोलन, मोर्चे काढण्याची तयारी सुद्धा दाखवली होती.मात्र, इंदुरीकरांनी त्यांना आंदोलनं आणि मोर्चे काढण्यापासून रोखलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या