केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून टोमॅटो उत्पादकांची दखल

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार
केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून टोमॅटो उत्पादकांची दखल

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

सध्या बाजारपेठेत टोमॅटोची( मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव पडले आहे. त्यामुळे याची तत्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar ) यांनी कृषीमंत्री तोमर व पियूष गोयल ( Agriculture Minister Tomar and Piyush Goyal )यांचेशी संपर्क साधत टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. आपण सदैव शेतकर्‍यांच्या पाठिशी असल्याचे प्रतिपादन ना.डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.

लासलगाव दौर्‍यावर आलेल्या डॉ.भारती पवार यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी बाजार समिती सभापति सुवर्णा जगताप यांनी सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या अल्प भावाकडे ना.भारती पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर ना.डॉ. भारती पवार म्हणाल्या की, टोमॅटो निर्यातीवर सध्या कुठलेही बंधन नसून निर्यात पूर्णत: खुली आहे.

उत्पादकांनी घेतलेल्या टोमॅटो पिकाची उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री होत असेल तर मार्केट इंटरवेनशन स्कीम च्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत मिळू शकते आणि स्कीमच्या माध्यमातून राज्य सरकारने जर मागणी केली तर केंद्र सरकार 50 टक्के तोटा सहन करून शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितले.

आता राज्य सरकारने त्वरित केंद्राकडे मागणी केल्यास केंद्र सरकार निश्चितच अडचणीत आलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यास मदत करेल. राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन केंद्र सरकारकडे तशी मागणी करावी. टोमॅटोचे भाव कमी झाल्याची तत्काळ दखल केंद्र सरकारने घेतल्याबद्दल ना.डॉ.भारती पवार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल, कृषीमंत्री तोमर यांचे आभार मानले. तर सुवर्णा जगताप यांनी भारती पवार यांचे आभार मानले.

महिला सभापतीचे कौतुक

लासलगाव बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला बाजार समिती सभापति होण्याचा बहुमान मिळाला आहे. तर सुवर्णा जगताप या सभापतिपदी विराजमान होऊन दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात त्यांनी शेतकरी, हमाल, माथाडी, व्यापारी अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे.

सध्या टोमॅटोला अत्यल्प दर मिळत असल्याने जनसंवाद यात्रेनिमित्त आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचेकडे त्यांनी शेतकर्‍यांचे पालकत्व स्विकारत टोमॅटोला मिळणार्‍या अत्यल्प दराकडे केंद्र शासनाने लक्ष देण्याची मागणी केली. त्याची तत्काळ दखल घेत भारती पवार यांनी कृषि व वाणिज्य मंत्र्यांशी थेट संपर्क साधत शेतकरी व मंत्री यांच्यातील समन्वयाची भूमिका पार पाडली.

त्यामुळे आता केंद्र आणि राज्य दोघांनीही समन्वय साधून टोमॅटो उत्पादकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे. तर याप्रश्नी सुवर्णा जगताप यांनी बजावलेल्या भूमिकेचे शेतकर्‍यांकडून स्वागत होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com