Friday, April 26, 2024
Homeनाशिकराज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा कट; गृहमंत्री नाशकात कडाडले

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा कट; गृहमंत्री नाशकात कडाडले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा किंवा अस्थिर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यामधून आता राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू करण्याचा प्रयत्न होतं आहे. पण, ते शक्य नाही. पोलिस (Police) ही परिस्थिती नियंत्रणात ठेवतील. पोलिसांनी राणा दाम्पत्यावर काल (दि. २४) केलेली कारवाई ही नियमानुसारच आहे….

- Advertisement -

तसेच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती. अटकेत असलेल्या व्यक्तीला भेटायला नातेवाईक किंवा वकील जायला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आहे.

ते नाशिक येथे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेत आल्यापासून विरोधक प्रयत्न करतं आहेत. त्यातून आता राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी राणा दाम्पत्यावर काल (दि.२४) केलेली कारवाई ही नियमानुसारच आहे. राणा दाम्पत्य प्रकरणात कुणाचा तरी हात आहे. त्याशिवाय ते धाडस करू शकत नाही. त्याचा पोलिस सखोल तपास करते आहे.

तसेच भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती. अटकेत असलेल्या व्यक्तीला भेटायला नातेवाईक किंवा वकील जायला पाहिजे; असे देखील त्यांनी सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत सांगितले.

दरम्यान, विरोधी पक्षाची उद्या बैठक होत असून राज ठाकरे सभा आणि भोंगे प्रकरणी चर्चा होईल. मनसे अध्यक्ष यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजी नाराजी होतच असते.

ठाण्यातल्या बदलीबाबत फेरविचार करावा वाटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेरील हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले हलल्याचे पोलिसांकडे इनपुट होते. पण, समन्वयात अडचणी आल्या. त्यात दोषी असलेल्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या