मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यांने झाडाला चादर व अंगातील बनियानच्या सहाय्याने दोरी करून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला असून याप्रकरणी कैदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

सुलतान भिकन तडवी (Sultan Tadvi) हा कैदी (Prisoner) येथील मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या (Murder) आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. या कैद्याने वैतागून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मंडल सात यार्ड क्रमांक 2 बॅरेक क्र. २ च्या पाठीमागे असलेल्या पिंपळाच्या झाडावर फांदीला बनियान व पांघरलेल्या चादर यांची एक दोरी बनवून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना इतर बंदिवान व कारागृहातील कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) घनश्याम बाळू मोहन यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com