Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंचा फोटो वापरून गंडा घालण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

आदित्य ठाकरेंचा फोटो वापरून गंडा घालण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

राज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांकडून सुरूच आहे. पोलिस अधिकारी, न्यायाधीश यांच्यानंतर आता शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांनी केला आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या वरळी कोळीवाड्यातील एका २४ वर्षीय व्यावसायिक कुस्तीपटूला व्हॉट्सॲपवर ठाकरे यांच्या नावाने संपर्क साधून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.

दादर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ५११ आणि ४१९ नुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या