मनपा आयुक्तांच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न

सायबर जागरूकतेमुळे टळली फसवणूक
मनपा आयुक्तांच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator of Nashik Dr. Chandrakant Pulkundwar)यांच्या नावाने अज्ञात भामट्याने व्हाट्स अप वर मेसेज टाकून पैसे मागितल्याचा प्रकार घडला दरम्यान मनपा आयुक्तांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये विविध प्रकारची शक्कल लढवून लोकांची आर्थिक फसवणुकीचे प्रकार अलीकडे घडले आहेत. ( दि.३) अज्ञात भामट्याने दुसऱ्या मोबाईल नंबर वरून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने व्हाट्स अप वर मेसेज ई पे द्वारे मला पैसे पाठवा असा मेसेज पाठवला.

या लिंक मध्ये आयुक्तांचा फोटो वापरण्यात आला असल्याने लोकांची फसवणूक होण्याची शक्यता होती मात्र सध्या सायबर फसवणुकीबद्दल लोकांमध्ये जागरूकता असल्याने कुणीही सदरहू नंबर वर पैसे पाठवले नसल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे वपोनी सुरजकुमार बिजली यांनी सांगितले.

मात्र हा प्रकार गंभीर असल्याने मनपा आयुक्तांनी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना सदर प्रकारची माहिती दिली. दरम्यान रात्री सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com