मला बदनाम करण्याचा प्रयत्न- खा.उन्मेष पाटील

मा.मंत्री सुरेश जैन व खा.पाटील यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल,राष्ट्रीय विद्यालयाच्या जागा विक्रीशी माझा संबंध नाही, विरोधकांना योग्य वेळी उत्तर देवू
मला बदनाम करण्याचा प्रयत्न- खा.उन्मेष पाटील

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

मी एक लोकप्रतिनिधी असल्याचे भान आहे. राष्ट्रीय शिक्षण विद्यालयाच्या जागेसंदर्भात माझा कुठलाही व्यवहार किवा आर्थिक लेणदेन झालेली नाही. माझे वडिल राष्ट्रीय विद्यालयाच्या निवडणुकीसाठी (National School Elections) उभे असल्याने, एक मुलगा या नात्याने मी त्यांचा प्रचार करीत आहेत. आणि ते माझे कर्तव्य आहे. विरोधक जाणून बुजून माझी बदनामी करण्यासाठी खोटा-नाटा प्रचार करीत आहेत. यासंदर्भात माजी मंत्री सुरेश जैन यांची एक क्लिप व्हायरल होत आहे. त्यात माझा नावाचा उल्लेख आहे. परंतू त्यात सत्यता नसून यासंदर्भात मी स्वता; मा.मंत्री सुरेशदादा (Former Minister Suresh Jain) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असून त्यात तथ्य समोर आले असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना दिली.

पत्रकार दिना निर्मिताने दि,६ रोजी खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयात पत्रकाराशी चर्चा करतांना खासदार उन्मेष पाटील यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. पुढे माहिती देताना खासदार म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रा साखरख्या पवित्र क्षेत्रात राजकारण करण्याची माझी अजिबाबत इच्छा नाही. ज्यांनी माझावर आरोप केले, त्यांनी संस्था घडवली का विकली, याचे आधी आत्मपरीक्षण करावे. मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी असून कुठे राजकारण करायचे याचे मला भान आहे. राष्ट्रीय विद्यालयाच्या जागा विक्री संदर्भात माझा आणि माजी मंत्री सुरेश जैन यांच्याशी कधीही संबंध आला नाही. तरी देखील त्यांची सुरेशदादाची एक व्हिडीओ क्लिप समाज माध्यांवर व्हायरल होत आहे. त्यात माझा नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात त्यांना कोणीतरी स्किप्ट लिहुन दिल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. यासंदर्भात मी त्यांचीशी बोललो असतो. मी राष्ट्रीय विद्यालयाच्या जागा विक्रीच्या व्यवहारा संदर्भात कधीच त्यांना भेटलो नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तरी देखील विरोधक माझा बद्दल अपप्रचार करुन, माझी बदनामी करण्याची प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात मी त्याना योग्यवेळी उत्तर देणारच आहे. परंतू शैक्षणिक संस्थेत मला राजकारण करायचं नाही. राष्ट्रीय विद्यालयाचे सभासद हे जागरुक सभासद असून ते नक्कीच योग्य उमेदवाराला निवडून देतील अशी माझी अपेक्षा आहे.

मा.मंत्री सुरेश जैन व खा. उन्मेष पाटील यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल-

दरम्यान माजी मंत्री सुरेश जैन व खासदार उन्मेष पाटील यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली असून सोशल मिडीयावर यासंदर्भात दिवसभर उलट-सुलट चर्चा होत्या. भविष्यात चाळीसगावच्या राजकारण यांचे दुरगामी परिणाम दिसणार असून खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील राजकिय लढाई पुन्हा एकदा यानिमित्नाने चवाठ्यावर आली आहे. तर राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत दोन्ही गटातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com