शिवभक्तीच्या मार्गातून मोक्षप्राप्ती - पं. मिश्रा

शिवभक्तीच्या मार्गातून मोक्षप्राप्ती - पं. मिश्रा

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

जन्म मृत्यूच्या चक्रव्युहातुन मुक्त होण्यासाठी परमात्मा शिव पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी शिवाच्या भक्तीत डुंबून जात जे करेल ते महादेव करेल ही विचारधारा ठेवत तुम्हास कशाचीही आसक्ती राहणार नाही तेव्हा समजून घ्या आपण शिवचरणा जवळ पोहोचलो आहोत.शिवभक्तीत बुडाल्यावरच मुक्तीच्या मार्गावर पोहचून मोक्ष प्राप्ती अटल ठरते असे विचार प्रख्यात शिव कथाकार पंडित प्रदीप मिश्रा महाराज (Pandit Pradip Mishra )यांनी आज येथे बोलताना मांडले.

येथील कॉलेज मैदानावर आयोजित श्री पुण्य शिव महापुराण कथा महोत्सवाच्या ( Shri Punya Shiv Mahapuran Katha Mahotsav)आज सहाव्या दिवशी पंडित मिश्रा यांनी शिवभक्ती आराधनाद्वारे मिळणाऱ्या मोक्षप्राप्तीवर निरूपण केले. सुमारे चार लाखावर महिला- पुरुष भाविक कथा श्रवणासाठी उपस्थित असल्याने असल्याने कॉलेज मैदानासह परिसर भाविकाच्या गर्दीने अक्षरशा फुलून गेला होता.

संपत्तीने बंगला, कार, सुख- वैभव सर्व काही प्राप्त करता येते, पैशांमुळे खून ,भांडणे सुद्धा होतात आजारी व्यक्ती लाखो रुपये उपचारावर खर्च करून बरा होऊ शकतो. परंतु पैशाने मृत्यू टाळता येत नाही हे वास्तव सत्य आहे. मृत्यूवर विजय फक्त महाकालचे स्मरणाने प्राप्त करता येतो असे स्पष्ट करीत पंडित मिश्रा पुढे म्हणाले सत्कर्म, सेवा, दान व पुण्यच अंत्यसमयी कामात येऊन तो तुमचा व्हॅन्टीलेटर दूर करू शकतो. त्यामुळे शिवभक्ती करत पुण्य पदरी पाडण्याची गरज असल्याचे सांगितले.

संकल्प तुम्ही करता परंतु भक्ती मुळे तो पूर्ण महादेव करतात कारण श्रीविष्णू वैकुंठात ब्रह्मदेव ब्रह्म लोकात इंद्रदेव इंद्रलोकात स्वर्गात वास्तव्य करतात फक्त एकमेव महादेव मृत्यू लोकात पृथ्वीवर भक्तांच्या कल्याणासाठी वास्तव्य करीत आहेत याकडे लक्ष वेधत पंडित मिश्रा म्हणाले आपण स्वतः ऐवजी दुसऱ्या गरजवंताचे भले करण्यास प्रारंभ करतो परमार्थाचे कार्य काहीही अपेक्षा न ठेवता हाती घेतो तेव्हा महादेवाची कृपा आपणावर सुरू होत असते संपत्ती बंगला वैभव तुमच्या सोबत येणार नाही दान भक्ती द्वारे अर्जित पुण्यत तुमच्या सोबत येणार आहे त्यामुळे देवाने जे दिले आहे त्यात सुखी समाधानी रहा दुःखी राहू नका रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हातानेच जायचे आहे त्यामुळे महादेवाकडे निरोगी जीवनाची कामना करा शरीर चांगले राहिले तरच सुखाने जगू शकणार असल्याचे सांगितले

चांगले आरोग्य , मजबूत प्रतिकारशक्ती व स्थिर मनासाठी रुद्राक्ष लाल दोऱ्यामध्ये गळ्यात घालण्याचे आवाहन करीत पंडित मिश्रा यांनी महादेवावर अर्पण केलेले पाणी व बेलपत्राद्वारे मिळणाऱ्या लाभाची माहिती उपस्थित भाविकांना दिली महादेवावर अर्पण केलेल्या सर्व वस्तू तुम्हाला मोफत मिळतात संकटे आल्यावर तुम्ही सैरभैर होतात परंतु शिव कथा व आराधना स्थिर ठेवण्याचे काम करते हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे सांगत पंडित मिश्रा म्हणाले नातेसंबंध हे फक्त तुमच्याजवळ असलेल्या संपत्ती सत्ता वैभव वi प्रतिष्ठेमुळे टिकून राहतात तुमच्यावर दुःख संकटे आल्यावर नातेसंबंध संपुष्टात येतात फक्त परमात्मा शिवच तुमच्या दुःखात तुम्हाला साथ देतात

कितीही मित्र निर्माण करा मात्र गॅस संपल्यावर शेजारीच कामात येतो तसेच तुम्ही वाटेल त्यांची आराधना करा परंतु अंत्यसमयी महादेवच येणार त्यामुळे महादेवाची मनापासून भक्ती आराधना करा तुमचे कल्याण निश्चित असल्याचे सांगितले

मालेगावच्या पवित्र भूमीवर होत असलेली शिव महापुराण कथा श्रवणा साठी आलेल्या लाखो भाविकांची उपस्थिती कलियुग नव्हे शिवयुग सुरू असल्याचे धोतक असल्याचे स्पष्ट करत पंडित मिश्रा म्हणाले लाखो भाविकांची दिवस रात्र सेवा मालेगावकर करीत आहे अन्नदान चहा दूध बिस्किट ब्लॅंकेट बॅगा चादर आधी विविध वस्तूंचे वाटप गरजवंत भाविकांना केले जात आहे. डॉक्टर रुग्णसेवा तर न्हावी मोफत दाढी कटिंग करत आहे इतकेच नव्हे तर चर्मकार बांधव मोफत चप्पल शिवून देत आहे ज्याच्या घरात नोकर आहेत ते कथास्थळी कचरा उचलत आहे मालेगावकरांचे महादेवावर असलेले भरभरून प्रेम या सेवेमुळे दिसून आले आहे तुमच्यावर या सेवेमुळे महादेवाची कृपा निश्चित होईल असा विश्वास पंडित मिश्रा यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com