Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याउदय सामंत यांच्या वाहनांंच्या ताफ्यावर हल्ला

उदय सामंत यांच्या वाहनांंच्या ताफ्यावर हल्ला

पुणे | प्रतिनिधी (Pune )

माजी मंत्री उदय सामंत ( Former Minister Uday Samant ) यांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले असता कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दगडफेकीत त्यांच्या गाडीची काच फुटली.

- Advertisement -

आज शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा ही पुण्यातील कात्रज भागात सुरू होती. त्या दरम्यान ही घटना घडली आहे. सामंत हे येथूनच जात होते.दरम्यान शिवसैनिकांनी सदरचा हल्ला केला असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या