शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारदार शस्राने सपासप वार; एमजी रोडवरील घटना

शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारदार शस्राने सपासप वार; एमजी रोडवरील घटना

नाशिक l प्रतिनिधी Nashik

शिवसेना पदाधिकाऱ्यावर (shivsena leader) शहरातील वर्दळीच्या एमजी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ (yashwant vyayamshala MG road Nashik) अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हला केल्याची घटना घडली. निलेश उर्फ बाळा कोकणे (Nilesh Bala Kokane) असे या सेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

नाशिक शहराच्या मध्य विधानसभा प्रमुख असलेल्या निलेश उर्फ बाळा कोकणे हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने प्रवास करत होते. याच वेळी एमजी रोडवरील यशवंत व्यायामशाळा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्राने वार केले.

यानंतर हल्लेखोर येथुन फरार झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाळा कोकणे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस(bhadrakali police station) तपास करत आहेत. कोकणे यांच्यावर हल्ला का झाला याचे कारण अद्याप समजू शकले नसते तरी सेनेतील पडलेले दोन गट, अंतर्गत वाद यांचा काही संबंध या हल्ल्यामागे आहे का? याची पडताळणी पोलीस यंत्रणा करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com