
नाशिक | प्रतिनिधी Nashik
मणी शंकर नेत्र रुग्णालयाच्या संचालिका प्रसिद्ध नेत्रेरोग तज्ञ डॉ. प्राची पवार यांच्यावर आज सायंकाळी अज्ञात इसमांकडून हल्ला झाला.
डॉ. प्राची पवार सायंकाळी गोवर्धन येथील त्यांच्या शेतातील घरात जात असताना काही अज्ञात्र इसम गेट जवळ बसलेले आढळले. डॉ. पवार यांनी त्यांनी हटकले असता, हातातील शस्त्राने त्यांनी डॉ. पवार यांच्यावर हल्ला केला. डॉ. प्राची पवार यांच्या हाताला जखम झाल्याने त्यांना पंडित कॉलनी येथील सुश्रुत या त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हाताला टाके पडले असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. प्राची पवार या राष्टवादीचे दिवंगत नेते डॉ. वसंत पवार व मविप्रच्या माजी सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या कन्या आहेत .