मुंबईसह उत्तर भारतात हल्ल्याचा कट?; एटीएसच्या तपासात 'हा' धक्कादायक खुलासा

मुंबईसह उत्तर भारतात हल्ल्याचा कट?; एटीएसच्या तपासात 'हा' धक्कादायक खुलासा

मुंबई | Mumbai

नुकतीच हरिहरेश्वरला (Harihareshwar) संशयित बोट आढळली आहे. यापाठोपाठ पाकिस्तानमधून मुंबईत (Mumbai) दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) घडवून आणण्यासाठी धमकीचा मेसेज आला. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे...

दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorist Squad) पुण्यात (Pune) लपून बसलेल्या दहशतवाद्याला (Terrorist) अटक (Arrested) केली होती. त्याच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात (Delhi and Uttar Pradesh) मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याचे या तपासातून निष्पन्न झाले आहे. यासाठी तयारीही सुरू केल्याची माहिती दहशतवादी जुनैद याने दहशतवाद विरोधी पथकाला दिली आहे.

याची तयारी अकोल्यात (Akola) सुरु होती. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) जाऊन ट्रेनींग घ्यायची होती. मात्र करोनामुळे (Corona) जाणे शक्य झालेले नाही. त्यामुळे तो येथेच ट्रेनिंग घेत असल्याचा दावा त्याने केला.

तर इतर राज्यातील १० ते १२ जणांनाही त्याने याच्या तयारीसाठी सोबत घेतले होते, असे म्हटले आहे. या लोकांचा नेमका प्लॅन काय होता. ते १० ते १२ जण कोण आहेत आणि याबाबत अधिक तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com